साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्हा कृषि विभागा मार्फत फळबागांना भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध फ़ळबागांना भेट, गाव बैठक तसेच चर्चा सत्राद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम चालू आहेत फळांवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण कृषी विभागामार्फत आयोजित करणार आहे. तसेच फळांचे गाव म्हणून धुमाळवाडीची नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे तसेच फळबाग लागवड योजनेत सहभागी होणे बाबत आव्हान यावेळी फलटण उपविभागाचे नूतन उपविभागीय कृषि अधिकारी कैलास धुमाळ यांनी भेटीवेळी सांगितले.
यावेळी धुमाळवाडी गावातील निळकंठ धुमाळ, सुशील फडतरे, राहुल पवार यांच्या सिताफळ, ड्रॅगन फ्रुट, अंजीर फळबागा व राजाराम पवार यांनी 24 प्रकाचे फळबाग लागवड याठिकाणी भेटीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी फलटण तालुका कृषि अधिकारी सागर डांगे, विडणी मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ, कृषी साहाय्यक दीपक बोडके, सचिन जाधव व धुमाळवाडी येथील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.