साखरवाडी गणेश पवार
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बूथ प्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन उद्या रविवार दि.25 जून रोजी सकाळी 10 वाजता महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष सतीश माने यांनी दिली आहे.
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र बुथ प्रमुख आ.शशिकांत शिंदे, सह प्रमुख आ.अरुण लाड, आ.दिपकराव चव्हाण, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, जिल्हा बुथ प्रमुख राजकुमार पाटील हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, सहकारी संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य, राष्ट्रवादी महिला आघाडी पदाधिकारी, सदस्य, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी, सदस्य आणि प्रामुख्याने तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन संपूर्ण रचना व मार्गदर्शन समजावून घ्यावे, असे आवाहन शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले आहे.