साखरवाडी(गणेश पवार)
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातून बरड येथून दिनांक 22 रोजी दुपारी 12.20 वाजण्याच्या सुमारास बागेवाडी बरड गावच्या हद्दीतून रमेश नाथ्याबा राऊत (वय 65 रा वडगाव निंबाळकर ता बारामती जि पुणे) हे बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलगा दत्तात्रय रमेश राऊत यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून पुढील तपास पो ना अभंग करीत आहेत