साखरवाडी (गणेश पवार)
यावर्षी गुरुवार दि 29 रोजी आषाढी एकादशी व मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण एकाच दिवशी आल्याने या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय फलटण तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी घेतला असून या शुक्रवारी दि 30 रोजी कुर्बानी करणार असून या निर्णयाचे फलटण तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आषाढी एकादशीला सर्व हिंदू बांधवांचा उपवास असतो त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव परंपरेनुसार फक्त सामूहिक नमाज पठण करणार असून यानंतर कोणीही कुर्बानी देणार नाही असा निर्णय फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसू ,बरड ,सरडे, साखरवाडी व अन्य गावांतील मस्जिद प्रमुखांनी घेतला असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली. सामाजिक भाईचारा राखत एकमेकांच्या श्रद्धा जपण्याच्या उद्देशाने आषाढी एकादशी दिवशी येत असलेल्या बकरी ईद या सणाला परंपरेनुसार फक्त सामूहिक नमाज पठण करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला असून तो निर्णय फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि. धन्यकुमार गोडसे यांना लेखी स्वरुपात कळविला आहे.