साखरवाडी (गणेश पवार)
लोणी ता खंडाळा गावच्या हद्दीत लोणंद-शिरवळ रस्त्यावर पल्सर दुचाकीचा अपघात होऊन सुरवडी ता फलटण येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सुरवडी ता फलटण येथील अजय राजेंद्र जाधव वय 20 व मयूर सुरेश परमार वय 20 या युवकांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून महेश जाधव हा युवक यामध्ये जखमी झाला आहे याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे