Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तालुक्यात विकास गंगा आणण्यात यशस्वी होतोय खा.रणजितसिंह 2023005

 


साखरवाडी ( गणेश पवार)

 फलटण बारामती रेल्वे,धोम बलकवडी बारमाही करण्याचे काम,व फलटण येथे जिल्हा न्यायालयास मंजूरी मिळाली असून ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आपण दिलेली खासदारकीची ताकद वापरली असल्याचे स्पष्ट मत खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.आषाढी एकादशीनिमित्त फलटण तालुक्याच्या दृष्टीने तीन चांगल्या विकास  कामांची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे सांगून ते पुढे म्हणाले


 फलटण बारामती रेल्वे पुर्ण करण्याचे स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न होते. त्याचे टेंडर निघाले आहे.आणि वर्क ऑर्डर दोन-तीन दिवसात निघेल. या मार्गाचे काम सुरू होईल. दक्षिणेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्या आता फलटणहून पुढे जातील इथून पुढे  फलटण हे महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असणार आहे.मला अभिमान आहे की स्वर्गीय स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो . दुसरा महत्त्वाचा अडीअडचणीचा विषय असा होता कोर्ट कचेरीच्या कामासाठी लोकांना सातारला जावं लागायचं ही बाब वकील मंडळींनी लक्षात आणून दिली होती. 30 जानेवारीला आपण या संदर्भात तत्वतः मंजुरी घेतली होती आणि काल झालेल्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली आहे.सप्टेंबर ऑक्टोंबर पर्यंत फलटणचे सेशन कोर्ट चालू होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट जनतेला मी शब्द दिला होता धोम बलकवडी आठमाही करणार .मात्र आता आठमाही  नव्हे तर बारमाही करणार  अतिरिक्त पाणी 0. 93 टीएमसी ची आपण मागणी केली होती. पाण्याचा शोध मी काही लावला नाही. स्कीमची आखणीही मी केली नाही.मात्र प्रश्न धुळखात पडलेला होता. मृतप्राय झाला होता. हे वाचनातून माझ्या लक्षात आल्यानंतर मी नुसती मागणी केली नाही तर त्याची तत्वता मंजुरी व फायनल मंजुरी घेतली.खरं तर पाणी वाटपाचं नियोजन धोम बळकवडीची आखणी झाली त्यावेळीच झालं होतं. धोम बलकवडी, फलटण बारामती रेल्वे, जिल्हा सत्र न्यायालय हे सर्व प्रश्न अडगळीत पडले होते. ती सर्व कामे प्रत्यक्ष मी मार्गी लावलेली आहेत.

0 .93 टीएमसी पाणी वर्षाच्या आतच फलटण तालुक्याला मिळणार आहे. जानेवारी 24 पर्यंत धोम बलकवडी चा कालवा बारमाई  झालेला असेल. कालवा कामाचं पाईप लाईन  टेंडर आजच प्रसिद्ध झाले  आहे .50 कोटीचे इलेक्ट्रिक कामाचं टेंडर राहिलेले आहे ते महिनाभरात  निघेल. जोड कालव्यास स्वराज हिंद असं नाव दिले आहे. त्यास तत्वता मान्यता दिली आहे. हा पहिला  जोड कालवा आहे. फलटण तालुका आणि खंडाळा तालुका या प्रकल्पामुळे बारमाही होणार आहेत या कालव्यामुळे फलटणच्या पूर्व भागाप्रमाणेच दक्षिण भागही पूर्णपणे बागायत  होणार आहे. जनतेला मी दिलेले सर्व शब्द लोणंद फलटण रेल्वे, फलटण बारामती रेल्वे, धोम बलकवडी,नीरा देवधर तसेच जिल्हा सत्र न्यायालय ,रस्त्यांची कामे  पूर्णत्वास जात आहेत.फलटण बारामती रेल्वे मार्ग बारामतीकरांच्या इच्छेविरुद्ध चालू करणे कठीण काम होतं.पण मी ते आव्हान मानून पूर्ण केले आहे. कोळकी येथे विभागीय सिंचन भवनास मंजूरी मिळाली असल्याची माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली. त्यांचे टेंडर येत्या पंधरा-वीस दिवसात निघेल. पाणी योजनांचे एकत्रित ऑफिस पुण्यानंतर फलटणला उभे राहत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.अतिरिक्त जिल्हा कार्यालय ,अतिरिक्त पोलीस मुख्यालय, अतिरिक्त उप परिवहन कार्यालयाची मागणी केली आहे ही सर्व कार्यालय मंजूर होतील याची मला खात्री आहे. त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. अप्पर तहसील कार्यालय साखरवाडी या ठिकाणी सुरू करावे अशी मागणी आपण केली आहे यामुळे तालुक्याला अतिरिक्त तहसीलदार उपलब्ध होईल .त्या ठिकाणच्या लोकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. या सर्व शुभवार्ता आपल्या मार्फत फलटणच्या जनतेला मला द्यायच्या होत्या असे आवर्जून त्यांनी सांगितले .मला या गोष्टीचा समाधान आहे की मी केलेल्या प्रत्येक मागणीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता  दाखवून ते काम मंजूर केले.  तीस चाळीस वर्ष पाण्यावर आज पर्यंत इथलं  राजकारण चाललं होतं चार वर्षाच्या कालखंडातील माझी अडीच वर्ष विरोधकांचे शासन होतं त्यातच गेली कोरोनात गेला मला प्रत्यक्ष काम करायला एक वर्षाचा या कालखंडात जनतेला दिलेली सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तालुक्यातील व माढा मतदार संघातील सर्व जनतेला शुभेच्छा देण्याबरोबरच मुख्यमंत्री यांचे जाहीर आभारही यांनी यावेळी मांडले यावेळी अभिजीत नाईक निंबाळकर अशोकराव जाधव नरसिंह निकम लतीफ तांबोळी उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.