साखरवाडी गणेश पवार
मोबाईल फोनवरून अश्लील शिवीगाळ व छुपा पाठलाग केल्याबद्दल फलटण शहर पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल झाला असून संशयित अमित अशोक चव्हाण राहणार श्रीकृष्ण नगर तारदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल झाला असून फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 16 मे रोजी दुपारी 12:28 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवरती फोन करू संशयिताने त्यांना अश्लील शिवीगाळ करून छुपा पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पो हवा येळे करीत आहेत