साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव,सातारा,फलटण, पाटण या तालुक्यातील तहसील व प्रांताधिकारी कार्यालयतील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ९ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयतील सहाय्यक करमणूक कर अधिकारी प्रतिभा खाडे यांची भोर तहसील कार्यालयात संगायो नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. सातारा प्रांताधिकारी कार्यालयातील विजयकुमार धायगुडे यांची सातारा तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी सातारा तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार दयानंद कोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरेगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण शाखेत बदली झाली आहे. फलटण प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विजय चांदगुडे यांची पुरंदर प्रांताधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. फलटण तहसील कार्यालयातील संगायो नायब तहसीलदार महादेव जाधव यांची पुरंदर येथे संगालो तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांच्या रिक्त जागी बारामती प्रांताधिकारी कार्यालयतील नायब तहसीलदार भक्ती सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाबळेश्वर तहसील
कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार दिपक सोनावले यांची नायब तहसीलदार वि.स.म. सं. पुणे येथे बदली झाली आहे. पाटण तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात यांची गडहिंग्लज निवडणूक नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. थोरात यांच्या जागी पुरंदर येथील निवासी नायब तहसीलदार उत्तम बड़े यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. वेल्हे (जि. पुणे) येथील निवडणूक नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांची जावली तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांनी पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे, असे राज्य शासनाचे आदेश आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही कारणावर रजेचा अर्ज मंजूर करण्यात येणार नाही. पदस्थापना केलेल्या ठिकाणी संबंधित अधिकारी रूजू न झाल्यास, दबाव आणल्यास, पदस्थापना रद्द झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.