साखरवाडी(गणेश पवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षणाचे महान कार्य करणाऱ्या स्वराज्यरक्षक, महापराक्रमी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची जयंती सुरवडी ता फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळ व सुरवडी ग्रामस्थ यांनी या जयंतीचे आयोजन केले होते त्यानुसार रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाअभिषेक करण्यात आला सायंकाळी 6 वाजता पालखीतून संभाजी महाराजांच्या मूर्तीची पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती मंडळातर्फे आज दि 15 रोजी फक्त महिलांसाठी 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे आयोजन करण्यात आले असून सुरवडीसह पंचक्रोशीतील तरुणी व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती संभाजी महाराज तरुण मंडळाकडून करण्यात आले आहे.