साखरवाडी गणेश पवार
निंभोरे ता फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 2007/2008 बॅचच्या जुन्या सवंगड्यांचा तब्बल 15 वर्षानंतर शाळेमध्ये स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वांनी मिळून शाळेला पिण्याच्या पाण्याचे जार भेट म्हणून दिले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तामध्ये या शाळेने आम्हाला भरभरून ज्ञान दिल्यामुळेच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहोत या ऋणातून कधीही मुक्त होता येणार नाही, मात्र काही प्रमाणामध्ये शाळेला मदत करण्याचा आमचा हेतू आहे, या उद्देशानेच आम्ही माजी विध्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेसाठी ही छोटीशी भेट दिल्याचा आनंद आम्हाला होत असल्याचे म्हटले. तसेच सर्व माजी विध्यार्थी व सर्व शिक्षकांनी शाळेत केलेल्या अनेक कामांबद्दल जॅक्सन ग्रुप चे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक फडतरे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन भुजबळ सर उपस्थित होते यावेळी शिंदे सर,गोडसे सर, ढमाळ मॅडम हे माजी शिक्षक तर निंबाळकर सर व ढेबरे सर हे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार कु.मयुरी यादव ने तर सूत्रसंचालन संजय निगडे यांनी केले.