साखरवाडी(गणेश पवार)
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये रावडी खुर्द तालुका फलटण येथील भरती झालेल्या महिला व युवकांचा सत्कार समारंभ राष्ट्रीय समाज पक्ष फलटण यांच्यातर्फे रावडी खुर्द याठिकाणी पार पडला
यावेळी सौ प्रियांका आकाश टेंगले यांची मुंबई पोलीस ,सोनाली महेश होळकर हिची पुणे ग्रामीण पोलीस, डोंबळवाडी गावचे सुपुत्र सागर तात्याबा सुळ याची सातारा पोलीस, योगेश पांडुरंग हुलगे याची मुंबई पोलीस तर सूरज टेंगले यांची बँकेमध्ये लिपिक पदावर निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
.यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ, तरडगाव जिल्हा परिषद गटप्रमुख नितीन सुळ, सोमेश्वर अकॅडमीचे शिक्षक काळे, तरडगाव गावचे रासप प्रमुख सुरेश किकले,रावडी बुद्रुकचे विठ्ठल सुळ, रावडी खुर्दचे सागर गायकवाड, डोंबाळवाडी गावचे अर्जुन ढोणे , मयूर शिंदे,गणेश होळकर,किरण चोरगे, ज्ञानेश्वर गायकवाड,बाळासो सुळ,भानुदास सुळ,राहुल सुळ , रोहित सुळ ,तसेच रावडी व पंचक्रोशी तील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
नितीन सुळ यांनी प्रास्ताविक केले त्यावेळी सांगितले आजचा कार्यक्रम घेत असताना येणाऱ्या काळात जास्तीत जास्त संख्येने पोलीस भरती स्पर्धा परीक्षा यश संपादन करावे हा यामागील एक हेतू आहे तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्यात चांगली कामगिरी करेल यात तिळमात्र शंका नसल्याचे म्हटले सागर गायकवाड यांनी आभार मानले.