विडणी-(योगेश निकाळजे)- -बुरूम बुरुम, केळीवाली, हर हर महादेव, झुमकावाली पोरं, चंद्राच्या ठसकेबाज लावणीच्या सुरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर,विडणी आयोजीत ' बहर ' 2023 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले,
विडणी(विद्यानगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्यावतीने विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बहर 2023 वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच आयोजीत करण्यात आले, कार्यक्रमास सरपंच सागर अभंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग,सौ.जयश्री शिंदे, सोसायटीचे संचालक सोनबा आदलिंगे प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, भोलचंद बरकडे,धनाजी पवार,दिलिप मुळीक,हिम्मत जगताप, लक्ष्मण शिंदे, इत्यादी मान्वरांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यानगर जिल्हा परिषद शाळेतून अनेक विद्यार्थानी शिष्यवृत्ती व इतरशालेय स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन केले आहे या यशामध्ये मुख्याध्यापक रवींद्र परमाळे व शिक्षिका कोरडे मॅडम यांचे महत्वपूर्ण योगदान असून त्यांना ग्रामस्थ व पालकांचेही सहकार्य मिळत असते यापुढेही ही शाळा असेच नावलौकिक मिळवेल असा विश्वास यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक अनिल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शाळेने विविध शालेय स्पर्धा, शिष्यवृती परिक्षा,सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये यश संपादन केल्याबदल मुख्याध्यापक रविंद्र परमाळे व वर्गशिक्षिका सौ.कोरडे मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले, उपस्थितांचे स्वागत सरपंच सागर अभंग यांनी केले,प्रास्ताविक परमाळे सर यांनी तर आभार कोरडे मॅडम यांनी मानले, बालचमूंचा कलाविष्कार पाहण्यासाठी पालक, ग्रामस्थ यांनी मोठी गर्दी केली होती.