साखरवाडी गणेश पवार
लोकहितवादी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतीदिन आणि त्यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाची सांगता असा संयुक्त कार्यक्रम साखरवाडी विद्यालयात दि 7 रोजी संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला जगदाळे यांच्याहस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजयदादा साळुंखे पाटील , पर्यवेक्षक बागडे सर व विद्यालयातील इतर सर्व शिक्षक बंधू भगिनींनी शाहू महाराजांच्या स्मृतीस अभिवादन केले. मुख्याध्यापिका जगदाळे मॅडम व विद्यालयातील सहाय्यक शिक्षक हरिदास सावंत यांनी छत्रपती शाहू महाराज्यांच्या एकंदरीत कार्यावर मार्गदर्शन केले .उपस्थित विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करून दिली शेवटी सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक निकालपत्रकांचे वाटप करण्यात आले