विडणी -(योगेश निकाळजे) -विडणी येथे संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
विडणी ( बौद्धनगर)ता.फलटण येथील संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने वैशाखी बुद्धपौर्णिमेनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, बुद्ध पौर्णिमेनिमिताने सकाळी 9 वाजता तक्षशिला बुद्धविहारात सामुदायिक त्रिशरण -पंचशील, बुद्धवंदना, भिमस्तुतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थितांना खिर वाटप करण्यात आले,दुपारी 12 वाजता कोळकी येथील श्रामणेर शिबिरामधील भंतेजींचा संघ विहारात दाखल झाला यावेळी भंन्ते धम्मरत्न यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी उपस्थितांना धम्मदेशना केली, यावेळी भारतीय बौद्धमहासभेचे फलटण तालुकाध्यक्ष महावीर भालेराव,बाबासाहेब जगताप,परमेश्वर कांबळे,शिला काकडे,राम मोरे,अमोल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी बौद्धनगरमधील सर्व उपासक उपासिका व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,उपस्थितांचे आभार योगेश निकाळजे यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर मंडळाच्यावतीने भव्य असा अन्नदानाचा कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला तसेच सायंकाळी 7 वाजता तथागत गौतम बुध्द व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची सवाद्य भव्यअशी गावातून शोभायात्रा काढण्यात आली, यावेळी उपासक उपासिका पांढरी वस्त्रे परिधान करून मोठया संख्येने शोभायात्रेत सहभागी झाली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नचिकेत जगताप, कैलास जगताप,सुमित जगताप, प्रथमेश निकाळजे, प्रमोद जगताप ,प्रज्योत निकाळजे विपुल जगताप, आदित्य निकाळजे,उमेश जगताप, विनोद जगताप,मंगेश जगताप,अश्वजीत निकाळजे, विशाल जगताप, विजय जगताप, दादासाहेब जगताप,राजेंद्र मोरे,अनिल जगताप,सागर जगताप,तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.