साखरवाडी (गणेश पवार)
क्लासला जाताना अल्पवयीन मुलीची व तिच्या मैत्रिणीची छेड काढून विनयभंग केल्याप्रकरणी सुरवडीतील दोन तरुणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ ते दिनांक २० रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास वेळोवेळी एसटी स्टॅण्ड ते आय.आय.टी लक्ष्मीनगर येथे फिर्यादी अल्पवयीन मुलगी क्लास पर्यंत आदित्य नारायण पवार व अक्षय पिलाजी आवटे (दोन्ही रा. सुरवडी ता.फलटण जि. सातारा) यांनी स्प्लेंडर मोटार सायकल एम.एच.११.ए.एच.४१०६ व टिव्हीएस मोटार सायकल वरून पाठलाग करून हॉर्न वाजवून अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणी यांचा विनयभंग केला अशी फिर्याद अल्पवयीन मुलीने शहर पोलिस ठाण्यात दिली असून आदित्य नारायण पवार व अक्षय पिलाजी आवटे या दोन तरुणांच्या विरुद्ध याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत.