Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनगाव येथील युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल pocso

 




साखरवाडी (गणेश पवार)वाघाची वाडी सांगवी येथे अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 15/02/2023 ते दि.30/04/2023 दरम्यान फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही  कॉलेजला जात असताना वाघाची वाडी सांगवी येथे संशयीत आरोपी अमित चंद्रकांत निकाळजे (रा. सोनगाव ता. फलटण) याने पाठीमागून येऊन फिर्यादी मुलीचा यांचा हात धरून "तू मला जास्त आवडतेस तू माझ्यासोबत रिलेशन मध्ये राहा" असे म्हणून त्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच "तू जर माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाहीस तर तुझे फोटो मी इंस्टाग्राम वरती टाकील" अशी धमकी देऊन फिर्यादी मुलीकडे पाहून फिरत होता म्हणून फिर्यादी मुलीने ग्रामीण पोलीस ठाण्यात अमित चंद्रकांत निकाळजे याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिक्षित करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.