साखरवाडी(गणेश पवार)
मौजे भाडळी खुर्द येथे शेतात लावलेला पोकलेन अज्ञान चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 01/01/2023 ते दि.02/05/2023 रोजीचे सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान (नक्की वेळ माहीत नाही) मौजे भाडळी खुर्द ता. फलटण येथे सचिन विनायक बोके यांचे शेतात सनी लक्ष्मण कदम (रा. ऐश्वर्या रेसिडेन्सी प्लॉट नंबर 3 लक्ष्मी नगर फलटण ता. फलटण) यांचा 5 लाख रुपये किंमतीचा एक टाटा हिताची कंपनीचा 2012 चे 200 मॉडेल प्रिव्हेशनल टेल्को कॉन्ट्रक्शन इको मेंट कंपनी लिमिटेड darwa 2530390/240856381-1 असा पोकलेन लावलेला केला होता. सदर पोकलेन ला काम नसल्याने तो तिथेच ठेवला होता. दिनांक 2/05/2023 रोजी फिर्यादी कदम हे मशीन पाहण्यासाठी गेले असता पोकलेन त्या ठिकाणी आढळून आला नाही कोणीतरी अज्ञान चोरट्याने चोरून नेहला आहे ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी कदम यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे करत आहेत.