Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकाऱ्यांकडून फलटण तालुक्यातील पालखी तळांची पाहणी pahani

 


साखरवाडी (गणेश पवार)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी  सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दिनांक 28 रोजी तरडगाव, काळज,निंभोरे,वडजल या ठिकाणच्या पालखी विसावा स्थळांना भेट देऊन  सार्वजनिक बांधकाम, महसूल व पोलीस विभागाला पालखी काळामध्ये भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी सुरवडी येथे जुन्या पालखी विसाव्या शेजारी नव्याने उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलाच्या दोन्ही बाजूनी  वाहतूक सुरू करून ज्या ठिकाणी रस्त्याचे व पुलाचे काम चालू आहे अशा ठिकाणी बॅरिकेट्स लावून काम सुरू असण्याबाबतच्या सूचनांचे मोठे फलक लावण्याच्या सूचना देऊन पालखी महामार्गावर असणारे विद्युत खांब व  ट्रांसफार्मर त्वरित काढण्याचे सूचना  संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या त्यांच्यासोबत फलटण उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, फलटण शहर चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, फलटण गटविकास अधिकारी अमिता गावडे, तरडगाव मंडल अधिकारी  टी बी भांगे,होळ मंडलाधिकारी व्ही.व्ही गाडे, फलटण मंडल अधिकारी एन नाळे, सुरवडीचे ग्रामसेवक एस आर राऊत, तलाठी एम आर सनभोर, पोलीस पाटील संतोष पवार,नितीन जाधव व सुरवडी ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते

 सुरवडी येथे दरवर्षी ज्या ठिकाणी पालखी विसावत होती तो  विसावा महामार्गाच्या विस्तारीकरणात गेल्यामुळे  या ठिकाणाहून पूर्वेकडे  300 फूट अंतरावर नवीन पालखी विसावा उभारण्याचे काम सुरू असून  यावेळची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पूर्वीच्या पालखी विसावा स्थळापासून   नव्याने उभारलेल्या पालखी विसाव्यावर थांबणार असल्याचे  सुरवडीचे ग्रामसेवक एस आर राउत यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.