साखरवाडी (गणेश पवार)
जिंती तालुका फलटण येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास संशयित दिलीप सदाशिव रणवरे वय 58 राहणार जिंती याने फिर्यादी घरी एकटी असताना तिच्या हाताला पकडून 'तू मला आवडतेस असे म्हणत अंगावर ओढून झोंबा झोंबी करून विनयभंग केल्याचे म्हटले असून या झटापटीत फिर्यादीच्या कानातील कर्णफुल व गळ्यातील मनी मंगळसूत्र पडून नुकसान झाल्याचे म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार यादव करीत आहेत