तरडगाव(नवनाथ गोवेकर)
फलटण तालुक्यातील कुसूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय किसन ठोंबरे तर व्हा. चेअरमन पदी दत्तात्रय सोपान धायगुडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पोपट नरुटे व नंदा नरुटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या दोन्ही रिक्त पदाच्या निवडीसाठी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये चेअरमन पदासाठी दत्तात्रय ठोंबरे व व्हा चेअरमन पदासाठी दत्तात्रय धायगुडे या दोघांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध म्हणून निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी सोसायटी सदस्य दादासो नरुटे, भाऊसो गोवेकर, संतोष ठोंबरे, सुनील कोळपे, नंदकुमार नरुटे, विलास गोरे, मंगल करे, बाळासो ठोंबरे , आदी मान्यवर, सभासद उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून एस पी साळुंखे व सोसायटीचे सचिव तानाजी सोनवलकर यांनी कामकाज पाहिले.
निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जि. प. मा. अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी व ग्रामस्थांनी कौतुक केले.
निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन दत्तात्रय ठोंबरे व व्हा. चेअरमन दत्तात्रय धायगुडे यांनी सर्वांच्या सहकार्याने संस्था व सभासदांभिमुख कारभार करुन संस्थेची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.