Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जोशी हॉस्पिटल फलटण येथे रोबोटिक्स तंत्रज्ञान वापरून सांधेरोपन शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न sampnn

  

 


साखरवाडी (गणेश पवार)

फलटण तालुक्यातील अस्थिरोग उपचारामध्ये अग्रगण्य नाव असणाऱ्या जोशी हॉस्पिटल  या आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित हॉस्पिटलमध्ये दि २५ मे २०२३ रोजी  'फलटण रोबोटिक्स सेंटर' येथे रोबोटिक्स चे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदा दोन गुडघ्यांच्या सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या.

भारतातले तालुका स्तरिय हे पहिलेच रोबोटिक सेंटर आहे असे जोशी हॉस्पिटल प्रा ली चे संचालक 

डॉ प्रसाद जोशी यांनी सांगितले . मोठ्या शहरात सुद्धा ही सुविधा काही मोजक्याच हॉस्पिटलस् मध्ये उपलब्ध आहे.

या आधुनिक उपचार पद्धतीवर बोलताना डॉ जोशी पुढे म्हणाले,VELYS RAS  असे या रोबोटिक मशीन चे नाव आहे ते Johnson & Johnson या कंपनी चे असून German Technology वापरून अमेरिकेत बनवले गेले आहे. आमच्या जोशी हॉस्पिटलमध्ये

 गेल्या २३ वर्षांपासून खूबे , गुढघे , खांदे यांचे सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या होत असूनआज पर्यंत ४ हजाराहून अधिक  सांधेरोपण शस्त्रक्रिया तालुकास्तरीय पातळीवर फलटण येथे यशस्वी झाल्या आहेत भारतात तालुका स्तरीय पातळीवर एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच सर्जन नी सर्वात जास्त सांधेरोपण केल्या मुळे २०१७ साली 

डॉ प्रसाद जोशी यांना 

'INDIAN ACHIEVERS AWARD ' ,२०१८ साली BHARAT GAURAV AWARD ने सन्मानित केले आहे 

 तसेच २०१२  पासून  

' BRAIN LABS ' या कंपनीचे 

' COMPUTER NAVIGATION ' हे सांधे रोपणासाठीचे लागणारे जर्मन उच्च तंत्रज्ञान जोशी हॉस्पिटल प्रा ली,  फलटण येथे उपलब्ध होतेच आणि ते सुद्धा त्यावेळी भारतातील तालुकास्तरीय पहिलेच Navigation machine असल्याचे डॉ प्रसाद जोशी यांनी नमूद केले.

रोबोटिक्स  चे तंत्रज्ञान शिकण्यासाठी डॉ प्रसाद जोशी यांनी FLORIDA USA येथील  सर्वात मोठ्या रोबोटिक्स लॅब मध्ये जाऊन प्रशिक्षण घेतले आहे . 

भारतातून त्यासाठी फक्त ७ डॉक्टरांमधून डॉ प्रसाद जोशी यांची त्यासाठी निवड झाली होती. 


सध्या जोशी हॉस्पिटल प्रा. ली. येथे सांधेरोपणासाठी  सातारा,  पुणे , मुंबई , नागपूर , लातूर ,नांदेड, उस्मानाबाद , कोल्हापूर , सांगली , पंढरपूर, सोलापूर , रत्नागिरी , लांजा , गोवा, बांदा, बंगळूर, काशी गया , अमेरिका आणि सौदी अरेबिया* हून patients येत आहेत.


फलटण तालुक्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण असून तालुका स्तरावरील भारतातले हे पहिलेच रोबोटिक सेंटर असल्याने महाराष्ट्रात आणि भारतात फलटण चे नाव नक्कीच उज्ज्वल होईल असा सार्थ विश्वास डॉ जोशींनी बोलून दाखवला.

जोशी हॉस्पिटलच्या सांधे रोपण तंत्रज्ञानामध्ये एक मानाचा तुरा खोवला गेला आहे आणि या अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांनाच होईल व तसेच अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरणारा Surgeon आणि त्याचे Skill हे ही फार महत्त्वाचे आहे असे डॉ प्रसाद जोशी यांनी प्रतिपादन केले.


Robotics चा फायदा हा सांधे-दुखी च्या सर्व patients ना लवकर आणि दीर्घ काळ बरे राहण्यासाठी होईल असे सांधेरोपण शस्त्रक्रिया तज्ञ डॉ प्रसाद जोशी यांनी नमूद केले.  


Robotics चे तीन ठळक फायदे खालील प्रमाणे :-

१. सांधेरोपणासाठी लागणारे हे सर्वात आधुनिक( Latest & Advanced) तंत्रज्ञान आहे.

२. त्यामुळे सांधेरोपणातील मिळणारी अचूकता ( Perfection) ही साधली जाते.

३. Patients लवकर बरा होऊन दीर्घ काळ दुःख विरहित राहतो.

 अशा तंत्रज्ञानाचा फायदा हा सर्वांनाच होईल असा विश्वास डॉ जोशी यांनी बोलून दाखविला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.