Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवसह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के nikal

 



तरडगाव(नवनाथ गोवेकर)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज बुधवार, दिनांक २५/०५/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये नायगाव नसरापूर येथील  नवसह्याद्री ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल लागला आहे.  या परीक्षेत एकुण ५ विद्यार्थी प्रथम विशेष प्राविण्य श्रेणीत तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यालयामध्ये गुंडेचा दिक्षा राजु हिने शेकडा ७९.०० गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक  परदेशी रिद्धी रितेश ७७.८३%, तृतीय क्रमांक कांबळे सिद्दी सुनील ७४.५०%, चतुर्थ क्रमांक गुजर मनिष राजेश ७३.८३, पाचवा क्रमांक तिप्पे अनुजा विजय ७१.८३% मिळवत घवघवीत यश संपादन केले. 


यशस्वी विद्यार्थ्यांचे  नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पी. एन. सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके,  महाविद्यालयाच्या संचालिका  सानवी सुके, प्राचार्य किरण पवार, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर वृंद, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.