निरा:
कापडगाव तालुका फलटण येथील महिलेचा नीरा नजिकच्या थोपटेवाडी गावचे हद्दीत डोक्यात दगड घालून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोकळ्या माळरानात अज्ञात व्यक्तीने आपल्या सासूच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची फिर्याद जावयाने जेजुरी पोलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार,संगिता शरद करे (वय 50 वर्षे) रा. कापडगाव ता. फलटण जि. सातारा असे मृत महिलेचे नाव असून जावई गोपीनाथ जगन्नाथ बरकडे (वय 28 वर्षे) धंदा शेती रा. पिसुर्टी ता पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.15 रोजीचे सायंकाळी 7.30च्या पुर्वी मौजे थोपटेवाडी गावचे हदीत पाझर तलावाजवळ ता. पुरंदर जि.पुणे येथे फिर्यादी बरकडे यांच्या सासू संगिता शरद करे यांना कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणास्तव त्यांचे डोक्यातत दगड मारून त्यांना जीवे ठार मारले आहे. याबाबत मंगळवारी पहाटे 12.39 वाजता गुन्हा दाखल झाला असून सकाळी माध्यमांना माहिती देण्यात आली. नीरा पोलीस दुरक्षेत्राच्या पोलिसांसह जेजुरी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या असून पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पो.नि. तावलकर सो. करित असल्याची माहिती देण्यात आली आहे.