साखरवाडी (गणेश पवार)
सत्तूरासारखे बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगल्या प्रकरणी दहिवडी पोलिसांकडून दोन युवकांना अटक करण्यात आली असून संशयित पवन नेताजी घाडगे (वय 20 ) रा बिदाल चौक दहिवडी तालुका माण व सुमित नवनाथ ठोंबरे (वय 21 )रा बिदाल रोड श्रीरामनगर दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा यांना अटक करण्यात आली असून दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहितीनुसार, दिनांक 15 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास दहिवडी येथे अजित मेडिकल समोर दोन युवक त्यांच्या मोटार सायकलच्या डिक्कीत सतूरासारखे हत्यार घेऊन उभे राहिले असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संशयित युवकांकडे चौकशी केली असता केली असता त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीच्या ऍक्टिवा नंबर एम एच 11 डी जे 3950 गाडीच्या डिक्कीतून सतुर सारखे दिसणारे घातक हत्यार काढून दिले ताब्या होंडा कंपनीची एक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच 11 डीजे 3950 च्या डिक्की मध्ये मिळून आले पुढील तपास पो ना बनसोड करीत आहेत सदर कार्यवाही मध्ये अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक,स्वप्निल म्हामणे पोलीस नाईक,तुषार हंगे पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश होता