साखरवाडी (गणेश पवार)
साखरवाडी,सुरवडी परिसरातील गावांमधून मागील बऱ्याच दिवसांपासून मोबाईलची रेंज अचानक 'गुल' होत असल्याने मोबाईल धारकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे मोबाईल रेंज गुल झाल्याने फोन न लागणे,लागलाच तर आवाज कट होणे,फोन अचानक कट होणे तसेच ब्रॉडबँड सेवा खंडित झाल्याने बँकांसहित इतर ऑफिस व सेतू मधील ऑनलाईनची कामे खोळंबत असून नागरिकांना यामुळे बँकांमध्ये व पोस्ट ऑफिस मध्ये ताटकळत उभे रहावे लागत आहे त्यामुळे मोबाईल धारकांबरोबरच बँकेमध्ये जाणारे नागरिक व ऑनलाईनची कामे करून घेताना नागरिकांना या खंडित सेवेचा फटका बसत असून संबंधित विभागाने तातडीने याची दखल घेऊन सेवेमध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
साखरवाडी मधील बीएसएनएल ऑफिसमध्ये जनरेटरची सोय नसल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर या परिसरातील ब्रॉडबॉण्ड व मोबाईल सेवा खंडित होत असून यामुळे बँका व इतर ऑनलाइन कामांना याचा फटका बसत असून मागील आठ ते दहा दिवसापासून या ठिकाणी बीएसएनएल बरोबर जिओ कंपनीची रेंज अचानक गायब होत असल्याने मोबाईल धारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे