साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथील सरदार वल्लभभाई हायस्कूलच्या 1978-79 च्या 10 तील सवंगड्यांची सुमारे 45 वर्षानंतर एकत्र येत स्नेह मेळावा व गुरुजन व कर्मचारी यांचा "कृतज्ञता सन्मान सोहळा" विद्यालयामध्ये नुकतेच आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाची सुरुवात दीप- प्रज्वलाने शाळेचे नुतन मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम.जी. नाळे सर तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात सर्व विद्यार्थीना संबोधित केले तसेच काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी बोलून दाखवल्या या सन 1978-79 बॅच च्या विद्यार्थ्यांनी शाळेस 35 खुर्च्या भेट दिल्या
कार्यक्रम संपल्यांनंतर सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थीनी स्नेह भोजनाचा आनंद घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला
या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी,माजी शिक्षक येवले सर,भोसले सर,दिक्षीत सर,एस.ए.जाधव सर,जे.डी.जाधव सर,पी.आर.कदम,बोराटे सर,जे.एम.जाधव सर व मोहिते सर याची प्रमुख उपस्थिती होती त्याच बरोबर माजी विद्यार्थीनी पुष्पा भोसले,पुष्पा खेसे,उज्वला राक्षे,उषा भगत,सुमन जाधव,शिला शिर्के यांची लक्षणीय उपस्थिती होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलावर शेख,मोहन जगताप यांनी केले व विशेष परिश्रम विलास यादव(दौंड),दादा भोसले,संपत रूपनवर यांनी केले