Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण शहरातील विकास कामांना 2 कोटी 20 लाख निधी मंजूर-अशोकराव जाधव nidhi manjur



साखरवाडी(गणेश पवार)


खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून फलटण  शहरातील विविध वार्डांमधील विकास कामांकरिता 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मा नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून आता विकासाची गंगा फलटण तालुक्यात व शहरात वाहत  आहे त्यामुळे पुढील काळात सुज्ञ फलटणकारांनी विकासाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 फलटण शहरात वार्डनिहाय मंजूर झालेले विकास कामे पुढील प्रमाणे, वार्ड क्रमांक 1 मध्ये पुजारी कॉलनी येथे सार्वजनिक शौचालय बांधणे 10 लाख, वार्ड क्रमांक 1 मध्ये मरीमाता मंदिर शेजारील नगरपालिका जागेत सभा मंडप बांधणे10 लाख, वार्ड क्रमांक 1 महादेव मंदिर परिसरात सभा मंडप बांधणे10 लाख, वार्ड क्रमांक 3 मध्ये इंदिरानगर मलटण येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 3 मध्ये झिरपे गल्ली मंगळवार पेठ परिसरात काँक्रीटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 4 मध्ये खवळे झोपडपट्टी मलटण येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 5 मध्ये कुंभार टेक गोसावी वस्ती येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे10 लाख, वार्ड क्रमांक 6 मध्ये शनी नगर अंतर्गत काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 6 मध्ये हत्तीखाना महात गल्ली अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 6 मध्ये ब्राह्मण गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 7 मध्ये रविवार पेठ चौंडेश्वरी मंदिर परिसर अंतर्गत काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 7 मध्ये मेटकरी गल्ली येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 8 मध्ये नंदीवाला वसाहत काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 8 मध्ये मोती चौक, घडशी गल्ली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 9 मध्ये धनगर वाडा येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 10 मध्ये शुक्रवार पेठ अंडी वाला बोळ परिसर काँक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 10 मध्ये अहिंसा मैदान येथे पेव्हर ब्लॉक बसवणे 10 लाख, वार्ड क्रमांक 11 मध्ये पद्मावती नगर येथे अंतर्गत काँक्रिटीकरण करणे 10 लाख,वार्ड क्रमांक 12 मध्ये हडको कॉलनी अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, वार्ड क्रमांक 12 मध्ये बारवबाग येथील ओपन मोकळ्या जागेत नाना नानी पार्क उभारणे 10 लाख, वार्ड क्रमांक 12 मध्ये विद्यानगर येथे मोकळ्या जागेत मूकबधिर शाळा येथे सामाजिक सभागृह बांधणे 10 लाख,वार्ड क्रमांक 12 मदरसा तालीमुल कुराण  लक्ष्मी नगर येथे बुजूखाना, ताहरत खाना पाण्याची टाकी बांधने 10 लाख असे एकूण दोन कोटी वीस लाख रुपयांच्या निधी मंजूर झाल्याची माहिती अशोकराव जाधव यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.