साखरवाडी(गणेश पवार)
फलटण येथे आज रविवार दि 14 पासून गुरुवार 25 मे पर्यंत श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व . मालोजीराजे यांची पुण्यतिथी दि . 14 मे रोजी आणि माजी आमदार स्व . शिवाजीराजे यांची जयंती दि . 25 मे रोजी आहे यानिमित्ताने 14 मे रोजी स्मृती महोत्सवाचे उद्घाटन व श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे ना . निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे . सन 2020/21 या वर्षीचा 13 वा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त उदय माहुरकर यांना जाहीर झाला आहे दि . 15 मे रोजी जुनी नवी हिंदी मराठी चित्रपट गीते , भावगीत गझल आणि लावणी कार्यक्रम , दि 16 मे रोजी हवामान तज्ञ डॉ . बी . एन . शिंदे यांचे व्याख्यान , दि 17 मे रोजी कथाकथनकार हिंमत पाटील यांचे कथाकथन , दि . 18 मे रोजी जतीन देसाई यांचे व्याख्यान , दि . 19 मे रोजी पुरातत्व अभ्यासक आशुतोष पाटील यांचे व्याख्यान , दि . 20 मे रोजी प्रा . डॉ . प्रतिभा जाधव यांचा एकपात्री प्रयोग ,. दि .24 मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या शाखा शाळांचा कलाविष्कार , दि . 25 मे रोजी स्मृती महोत्सव समारोप व बक्षीस वितरण होणार आहे . हे सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणात सायंकाळी 6 वाजता होणार असल्याचे श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी सांगितले .