साखरवाडी गणेश पवार
वाठार निंबाळकर तालुका फलटण येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नातलगांनी फिर्याद दिली असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 13 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रद्धा दत्तात्रय कोरडे (वय 19) ही राहत्या घरातून बाथरूमला जाते असे सांगून कुठेतरी निघून गेली असून ती परत न आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास स. फौ. राऊत करीत आहेत