तरडगाव प्रतिनिधी
डोंबाळवाडी तालुका फलटण येथून दिनांक 23 मे पासून बेपत्ता असलेला सचिन नागनाथ धायगुडे वय 35 या युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन प्रदीप दत्तात्रय टेंगले व राहुल नामदेव धायगुडे दोघेही रा डोंबाळवाडी या संशयतांना अटक केली असून सचिन धायगुडे यांचा गळा दाबून खून करून मृतदेह बंद असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकल्याची कबुली संशयतांनी दिली आहे