साखरवाडी(गणेश पवार)
निंभोरे ता फलटण येथील महिला सरपंच यांना गाडी आडवी मारून धमकी देऊन गाडीचे नुकसान केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनाक 14 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी निंभोरे सरपंच कांचन रमेश निंबाळकर (रा. निंभोरे सध्या रा. डी एड चौक फलटण ता. फलटण) यांना नितीन विनायक मदने (रा. निंभोरे ता.फलटण) यांच्या सांगण्यावरून दोन ओळखी इसम वय अंदाजे 30 ते 35 वर्षे हे मोटरसायकल वरून फिर्यादी यांचे गाडीला बोबडे पेट्रोल पंप निंभोरे येथे आडवी मारून थांबवून तू मयूर खोमणे व स्नेहल धनंजय रणवरे यांचे वाटेला जायचे नाही वाटेला गेले तर कसे असते ते बघितलं का अशी धमकी देऊन फिर्यादीचे स्कुटीला लाथ मारून स्कुटीचे नुकसान केले म्हणून फिर्यादी कांचन रमेश निंबाळकर यांनी नितीन विनायक मदने व दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.हवा काशीद करत आहेत.