साखरवाडी(गणेश पवार)
जिंती तालुका फलटण येथे पोलीस स्थानकात तक्रार का दिली असे म्हणत एकाला लाकडी दांडके व लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जिंती येथील जीतोबा मंदिरा शेजारी दिनांक 27 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दिलीप सदाशिव रणवरे वय 58 रा जिंती यांना संशयित मनोहर मोहन रणवरे, सोनल मनोहर रणवरे, लिलाबाई मोहन रणवरे, सागर मनोहर रणवरे, जीवन दिलीप रणवरे, दिलीप रतन सिंह रणवरे, सुनिता दिलीप रणवरे, वृषभ दिलीप रणवरे, मोहन कृष्णा रणवरे सर्व राहणार जिंती तालुका फलटण यांनी आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार का दिली म्हणत लाकडी दांडक्यान, लोखंडी पाईपने, लाथा बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत