साखरवाडी गणेश पवार
सुरवडी तालुका फलटण येथील 15 फाटा या ठिकाणी विवाहितेचा विनयभंग केल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित रवींद्र हनुमंत जगताप व हनुमंत निवृत्ती जगताप या दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 7 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची पत्नी घराशेजारील कॅनॉल वरती कपडे धुण्यासाठी गेली असता संशयित रवींद्र हनुमंत जगताप हा तिथे गेला व 'तू मला आवडतेस तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे असे म्हणून फिर्यादीच्या पत्नीचा हात पकडून विनयभंग केल्याचे व याबाबत फिर्यादी जाब विचारण्यासाठी संशयतांच्या घरी गेला असता संशयित रवींद्र हनुमंत जगताप व हनुमंत निवृत्ती जगताप या दोघांनी फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला या ठिकाणी राहून देणार नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे करीत आहेत