विडणी -(योगेश निकाळजे) - विडणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गरजूंना व कामगार लोकांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याची सोय केली असून याबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा फायदा लोकांना मिळण्यासाठी गरजूंनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
विडणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गरजूंना व कामगारांना दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येणार असून याचा शुभारंभ करताना सरपंच सागर अभंग बोलत होते यावेळी गावातील मान्यवर, ग्रामपंचायत कर्मचारी व कामगारवर्ग उपस्थित होता.
ग्रामपंचायतीमार्फत विविध शासकीय योजना सुरू असून सामाजिक सुरक्षा पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये,हत्यारे खरेदी 5,000 रुपये सुरक्षा संच अत्यावश्यक संच शैक्षणिक मदत योजना ( कामगारांच्या दोन मुलांना व पत्नीला) पहिली ते सातवी दरवर्षी 2500 रुपये,आठवी ते दहावी दरवर्षी5,000 रुपये अकरावी ते बारावी दरवर्षी 10,000 रुपये तेरावी ते पंधरावी दरवर्षी 20,000 रुपये, सोळावी ते सतरावी दरवर्षी 25,000 वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी1,00,000 रुपये,अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 60,000 रूपये इतकी आवश्यक फी मिळते,आरोग्य विषयक योजनाही संपूर्ण कुंटूंबासाठी असून पत्नीस नॉर्मल डिलिव्हरीसाठी15,000,सिझेरियन डिलिव्हरीसाठी 20,000, गंभीर आजार उपचारासाठी1,00,000, अंपगत्व आल्यास 2,00,000 एका मुलीवर कुटूंब नियोजन केल्यास1,00,000, व्यसनमुक्ती केंद्र उपचारासाठी6,000 रुपये मिळणार आहेत.
कामगाराचा कामावर मृत्यु झाल्यास 5 लाख रुपये, नैसर्गिक मृत्यु झाल्यास 2 लाख 22 हजार, घरकुल 2 लाख,अंत्यविधिसाठी 10 हजार, विधवा पत्नीस व विधूर पतीस दरवर्षी 24 हजार 5 वर्षापर्यंत मिळणार आहेत.
दरम्यान झ्मारत व झ्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,योजना सुरू असून यासाठी पात्र लाभार्थी बांधकाम कामगार,गवंडी कामगार, बिगारी,हेल्पर, खोदकाम कामगार,प्लंबर, वेल्डर,फिटर, इलेक्ट्रिशन,सुतार,पेंटर या कामगारांना सदर योजनांचा लाभ नोंदणी केल्यानंतर मिळणार असून आता कामगार लाभार्थासाठी रोज दोन वेळचे मोफत जेवण देण्यात येत असून दररोज सकाळी 8 वाजता व सायंकाळी 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे याचे वाटप करण्यात येणार आहे यासाठी आधारकार्ड,रेशनकार्ड, बँक पासबुक, नियुक्तीचे प्रमाणपत्र, वारसाचे आधारकार्ड व फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत यासाठी नावनोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालय विडणी याठिकाणी भेट द्यावी असे आवाहनही सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.