विडणी -विडणी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री.महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री.महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस गुरूवार दि.4 मे रोजी असून सकाळी 8 वाजता देवीस नहान व अभिषेक करुन त्यानंतर आरती होईल, सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत पोतराजांचा लक्ष्मीदेवीच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे,यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गावातील भाविक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणार असून रात्री 9 वाजता मनोरंजनासाठी वसंतराव नांदवळकर सह रविंद्र पिंपरीकर यांचा लोकनाटय तमाशा होणार आहे.
शुकवार दि.5 रोजी पहाटे 4 वाजता महालक्ष्मी देवीचा गावातून वाजतगाजत छबिना निघणार आहे व सकाळी 10 वाजता पुन्हा वसंतराव नांदवळकर सह रविंद्र पिंपरीकर यांचा लोकनाटय तमाशा होणार आहे त्यानंतर यात्रेची समाप्ती होणार आहे.