Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण येथे विनापरवाना कॅफे शॉप चालकावर गुन्हा दाखल cafe shop

 



साखरवाडी ( गणेश पवार  ) परवाना नसाताना कॕफे चालविणार्या विरुद्ध फलटण शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. फलटण शहरात अश्या प्रकारचे अनेक अनधिकृत कॕफे असून यावरही कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लक्ष्मीनगर फलटण येथे  अदित्य  कँफे चे  मालक अदित्य दत्तु मदने (वय 19वर्षे) रा फलटण याच्याकडे कँफे बाबतचा परवाना नाही तसेच मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कँफे शाँपमध्ये बैठक व्यवस्था सिसिटीव्ही कँमेराच्या कक्षेस येईल अशी नसुन दरवाजे पारदर्शक नाहीत व  बैठक व्यवस्था स्पष्ट दिसेल अशी प्रकाश योजना नाही त्यामुऴे सदर कँफे मालकाने मा. जिल्हाधिकारी सो.सातारा यांचे आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुद्ध सरकार पक्षातर्फे पोलीस कॉन्स्टेबल   मुकेश घोरपङे यांनी दिल्याने गुन्हा.रजि करण्यात आला आहे .याप्रकरणी अधिक तपास पो.हवा.सोनवलकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.