साखरवाडी गणेश पवार
सरडे तालुका फलटण गावातून एकाच रात्री चोरट्यांनी दोन दुचाकी गाड्या लंपास केल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून फिर्याद महेंद्र रघुनाथ खरात रा सांगवी ता फलटण यांनी दिली असून त्यानुसार दिनांक 3 रोजी फिर्यादी सरडे येथील त्यांच्या मावशीच्या घरी गेले असता रात्री 12 ते 4 वाजण्याच्या सुमारास दारात लावलेली त्यांची होंडा कंपनीची शाईन गाडी नंबर एम एच 11 CX 83 26 व गावातीलच रोहित गोरख भोसले यांची स्प्लेंडर प्लस नंबर एम एच 11 DG 5841 या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास पोलीस नाईक काशीद करीत आहेत.