Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ट्रिपल सीट बुलेटचा पाठलाग करताना पोलीस गाडीला अपघात apghat

 




साखरवाडी (गणेश पवार)

फलटण शहर पोलीस एका सुसाट वेगाने जाणाऱ्या ट्रिपल शिट बुलेट चा पाठलाग करत असताना पोलीस गाडीचा अपघात झाला असून अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक २५ रोजी गुरुवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमाराला  हे शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी एम.एच.११.ए.बी.२८६ या पोलिस गाडीतून एका सुसाट वेगात चालवणाऱ्या ट्रिपल शिट बुलेट चा पाठलाग करत असताना हडको कॉलनी येथील जाधववाडी रस्त्याने गणपती मंदिर येथील अंतर्गत रस्त्याने गाडी चालली असता अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्यात पोलिस गाडी वेगात गेली व गणपती मंदिर च्या कंपाऊंडला गाडी धडकली. यावेळी गाडीचे एअरबॅग ओपन झाले या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असता लगेचच पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती दरम्यान ज्या बुलेट गाडीचा पाठलाग पोलिस कर्मचारी करत होते तो अद्याप सापडला नसून शहर पोलिस बुलेट गाडीची व त्या तिघांची ओळख पटवत असून याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.