विडणी (योगेश निकाळजे ) - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विडणीत महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
विडणी (बौद्धनगर)येथील संघमित्र तरुण मंडळाच्यावतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये लहान मुलांसाठी विविध स्पर्धात्मक व सांस्कृतिक कलागुणात्मक कार्यक्रमही आयोजीत करण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुले सहभागी झाले, यामध्ये यशस्वी स्पर्धकांना मंडळाच्यावतीने बक्षीस देण्यात आली यावेळी बौद्धनगरमधील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांची गावातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली, यावेळी सरपंच सागर अभंग यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,या शोभायात्रेत बौद्धनगरमधील उपासक -उपासिका, युवावर्ग तसेच गावातीलही युवावर्ग व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.
संघमित्र तरूण मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आलेला भिमजयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रथमेश निकाळजे, मिहिर जगताप, ऋतिक जगताप,सौरभ जगताप, सुमित जगताप, प्रज्योत निकाळजे,गौरव जगताप, प्रबुद्ध निकाळजे,नचिकेत जगताप, रमाकांत जगताप,अश्वजीत निकाळजे,आदित्य निकाळजे, शुभम जगताप, विपुल जगताप,सुशिल जगताप, उमाकांत जगताप तसेच मंडळाचे व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.