Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विडणीच्या भैरवनाथाच्या यात्रेनिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन yatara

 



 विडणी ( योगेश निकाळजे) -विडणी गावाचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथाची यात्रेनिमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    श्री. भैरवनाथ देवाच्या यात्रेस सोमवार दि.17 एप्रिलपासून सुरुवात झाली असून यादिवशी भैरवनाथ व जोगेश्वरीचा हळदी समारंभ झाला, मंगळवार दि.18 रोजी सायंकाळी 6.30 वाजता भैरवनाथ व जोगेश्वरीचा विवाह समारंभ संपन्न झाला रात्री 8 वाजता शेंडे यांचा मानाचा रुखवत वाजतगाजत मंदिरात आणल्यानंतर त्यानंतर रात्री 9 वाजता भैरवनाथ मंदिरात महिलांचा उखाण्यांचा व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न झाले 

    बुधवार दि.19 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून गावातील भाविक पुरणपोळीचा नैवेद्य देवाला अर्पण करतात त्यानंतर शेंडे मानकरी यांची समाज आरती झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यानंतर मानाच्या काठयांचे गावातून वाजतगाजत मंदिरात आगमन होणार आहे, तसेच नाळे मानकरी यांचा कुसुंबाचा नेवैद्य देवाला दाखवला जाणार आहे,रात्री 9.30 वाजता मनोरंजनासाठी रुपाली पाटील यांचा लोकनाटय तमाशा होणार आहे,पहाटे 5 वाजता ग्रामदक्षिणा घालण्यासाठी भैरवनाथ- जोगेश्वरीची पालखी (छबिना) व मानाच्या सासन काठयांची भव्य मिरवणूक निघणार आहे.

   गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता रुपाली पाटील यांचा लोकनाटय तमाशा होणार आहे तर दुपारी 4 वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.