साखरवाडी (गणेश पवार) 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यासह संपूर्ण भारतभरामध्ये उत्साहात साजरी झाली यावेळी फलटण शहरामध्येसुद्धा भव्य दिव्य स्वरूपात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करून शिस्त बद्ध पद्धतीने जयंती साजरी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी
दिनांक 19 रोजी प्रांत कार्यालय फलटण येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला यावेळेस उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते