साखरवाडी गणेश पवार
9 सर्कल साखरवाडी ता फलटण येथे जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी गज व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याची फिर्याद प्रियंका महेश यादव वय 24 रा 9 सर्कल साखरवाडी यांनी दिली असून संशयित रोहित विश्वास यादव, प्रमोद विश्वास यादव व मंगल विश्वास यादव यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 18 रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अंघोळ करीत असताना यातील संशयित रोहित यादव यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीच्या डोक्यात गजाने मारहाण केल्याचे व प्रमोद यादव याने हाताने व लाथाबुक्याने मारहाण केल्याचे तसेच सासरे बाळू श्रीरंग यादव हे भांडण सोडवण्यासाठी आले असता रोहित यादवने त्यांना सुद्धा गजाने मारहाण करून फिर्यादीचे दीर कुमार बाळू यादव याला मंगल विश्वास यादव यांनी दगड मारल्याने त्यांच्या हाताचे बोट फॅक्चर झाल्याचे व संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत