साखरवाडी( गणेश पवार) : साखरवाडी , ता . फलटण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचा सन 2023/24 साठीचा ऊस वाहतूक कराराचा शुभारंभ कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात वाहतूक कंत्राटदार प्रवीण मोरे यांच्या हस्ते करण्यात आला . दरम्यान , कंपनीचे संचालक जितेंद्र धारु यांनी मागील गळीता हंगामामध्ये गळीतास आलेल्या 6 लाख 80 हजार मेट्रिक टन गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण ऊस बिल शेतकऱ्यांना व तोडणी वाहतूक कंत्राटदारांना कमिशन डिपॉझिट सहित सर्व देय रक्कम वर्ग केली असून आगामी गळीत हंगामात कारखाना प्रतिदिन 10 हजार मॅट्रिक टन क्षमतेने चालणार असून 12 लाख मे . टन गळीताचे उद्दिष्ठ असून त्या अनुशंगाने तोडणी वाहतूक करार सुरु केले आहेत. तरी तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी आपल्या वाहनाचा करार विभागीय गट ऑफिसशी संपर्क साधून पूर्ण करुन घ्यावा , असे आवाहन जितेंद्र धारू यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप , मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील , ऊस पुरवठा अधिकारी दिगंबर माने,को जन मॅनेजर दीपक मोरे,फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले , पोपट भोसले , सुहास गायकवाड,पै संतोष भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले,केनयार्ड सुपरवायझर एस के भोसले,साखरवाडी गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष सुरेश भोसले,महेश पवार,राहुल भोसले,राहुल पवार,विशाल बोन्द्रे,सुरेश भोसले,धनंजय भोसले, विश्वजीत भोसले ,आकाश जगताप,लालासो ठोंबरे,चिंगोबा होळकर,महेश सुळ, ऊस तोडणी कंत्राटदार व श्री दत्त इंडिया कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते .