साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहरात पारंपरिक शिवजयंती दि 22 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हजारो शिवभक्त,अबाल वृद्ध,तरुण,महिला सहभागी झाले होते. शिवजयंती निमित्त बाईक रॅली , चित्ररथ , वाद्यवृंदांची रेलचेल , व्याख्यान , मिरवणुका देखावे , अभिषेक अशा अनेक विविध उपक्रमांनी भव्यदिव्य शिवजयंती साजरी झाली . शिवप्रेमींनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय , जय भवानी जय शिवाजीच्या शिवगर्जनेने फलटण शहर दुमदुमुन गेले होते यावेळी मिरवणुकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राणी येसूबाई , महाले , महात्मा फुले , राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासह अनेक चित्ररथ लक्षवेधी ठरले यावर्षी फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती व फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव फलटण तालुका या दोन समित्यांद्वारे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये फलटण तालुका शिवजयंती समितीने कडून शनिवारी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याची सुरुवात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली . रॅलीत ते स्वतः ही सहभागी सायंकाळी 7 वाजता आ . रामराजे नाईक निंबाळकर , संजीवराजे नाईक निंबाळकर , आ . दीपक चव्हाण , रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शाही मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीमध्ये डीजे , घोडे , इतिहासातील ऐतिहासिक पात्रे , बैलगाडी , संबळ वादक , केरळी वाद्य , महिला पुरुष झांज पथक , लाइट्स शो , झेंडे घेतलेले मावळे , तुतारी वादक आदी वाद्यवृंदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले . समितीच्यावतीने भव्यदिव्य असा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला . फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवामध्ये शिवव्याख्याते प्रा . नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान झाले . त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे नाईक निंबाळकर , संजीवराजे नाईक निंबाळकर , रघुनाथराजे नाईक निंबाळकर , आ . दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला . तसेच गजानन चौकात फलटण तालुका सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने तीस फुटी अश्वारूढ पुतळ्यास खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत अठरा पगड जातीच्या शिवप्रेमी व शिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांच्या हस्ते देशभरातील 5 नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक केला
शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार : खा . निंबाळकर
फलटणमधील मुख्य चौकामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्यांचे सुशोभीकरण करून शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी सदरचे काम लवकरच हाती घेणार आहे . त्यातूनच नवी पिढी या महापुरुषांच्याकडून आदर्श घेईल , अशी माहिती खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली .
शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार : संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी आहे . ऐतिहासिक परंपरा असलेल्या फलटण शहरामध्ये शिवप्रेमींच्या मागणीवरुन शिवजयंती उत्सव समिती पुढील शिवजयंतीपूर्वी फलटण शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार आहे , असे प्रतिपादन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले .