साखरवाडी (गणेश पवार)
फलटण शहरातील नगरपालिकेच्या उत्तर बाजूस बंद असलेल्या गाळ्याच्या शेजारून दि 20 रोजी दुपारी 12 ते 12.20 वाजण्याच्या सुमारास 33 हजार रुपये किंमतीचे 11 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली असून फलटण शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याची फिर्याद विमल साहेबराव भोईटे (वय 70)रा सरडे ता फलटण यांनी दिली असून पुढील तपास पो हवा. विरकर करीत आहेत