साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी तालुका फलटण येथे दिनांक 22 एप्रिल रोजी शिवजन्मोत्सव समिती व पिंपळवाडी, साखरवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून शिवजयंतीसाठी ची सर्व तयारी पूर्ण झाली असून दिनांक 22 एप्रिल रोजी किल्ले रायगड वरून शिवज्योत आणली जाणार असून दुपारी 3 वाजता शिवज्योतीचे पूजन होऊन ज्योतीची मिरवणूक पिंपळवाडी येथून निघणार आहे 4.30 वाजता छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जल व दुग्धभिषेक होणार असून सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पूजा व आरती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व श्री दत्त इंडिया कारखाना पदाधिकारी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर श्री बजरंगबली यांचा जिवंत देखावा सादर होणार असून छत्रपती शिवाजी महारांजाच्या मूर्तीची भव्य मुरवणूक निघणार आहे तरी साखरवाडीसह पंचक्रोशीतील शिव भक्तांनी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजन्मोत्सव समिती व ग्रामस्थांनी केले आहे.