Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय बौद्ध महासभा फलटण यांच्यावतीने कोळकीत दहा दिवसीय श्रामणेर शिबिर shibir

 


 विडणी (योगेश निकाळजे)-भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण यांच्यावतीने कोळकी येथे उद्यापासून दहा दिवसीय श्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

      दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा फलटण यांच्यावतीने कोळकी ता. फलटण येथील फुले,शाहू,आंबेडकर सामाजिक सभागृह बुद्धविहारामध्ये गुरुवार दिनांक 27 एप्रिल 2023 ते 6 मे 2023 दरम्यान दहा दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले असून चैत्यभूमी मुंबई येथील पुज्य भन्ते धम्मरक्षितजी थेरो यांचे प्रशिक्षणार्थींना मागदर्शन लाभणार आहे,तरी 18 वर्षे पूर्ण झालेल्या बौध्द बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे व बौद्ध धम्म प्रचार व प्रसाराकरीता या शिबिराच्या माध्यमातून बुध्द धम्म समजून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

      या शिबिरात सहभागी होताना आवश्यक साहित्य व गरजेची औषधे घेऊन गुरुवारी दुपारी 3 वाजता मुंडन करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे,अधिक माहितीसाठी महावीर भालेराव यांच्या 9921139224 या मोबाईलवर संपर्क साधावा.

      या श्रामणेर शिबिराचे उद्घाटन तालुका अध्यक्ष आयु.महावीर भालेराव यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातारा जिल्हाध्यक्ष आयु.श्रीमंत घोरपडे हे असणार आहेत,कार्यक्रमास केंद्रीय शिक्षक अविनाश बारसिंग, नानासो मोहिते,दादासाहेब भोसले, यशवंत खुंटे, अरुण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तसेच फलटण येथील जयसिंग घाडगे, भिकू भोसले, बाबासाहेब जगताप,शिला काकडे, विठ्ठल निकाळजे,अविनाश जगताप तसेच सातारा जिल्हा पूर्व पदाधिकारी, फलटण तालुका सर्व पदाधिकारी,सचिव,संघटक उपस्थित राहणार असून या श्रामणेर शिबिराचा समारोप शनिवार दि.6 मे रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.