साखरवाडी (गणेश पवार)
फलटण शहरात दिनांक 22 रोजी साजरा होणाऱ्या शिवजयंतीला फलटण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व फलटण तालुका शिवजयंती उत्सव समिती या दोन्ही उत्सव समितीने शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे दोन मिरवणुकांसाठी परवानगी मागितली होती याबाबत फलटण शहरामध्ये शिवजयंती उत्सव शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शासकीय कार्यक्रम वगळून इतर सर्व वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून दिनांक 22 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्यात आले असल्याचे मात्र या काळात नागरिक व शिवभक्त यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन व दर्शन घेण्याची मुभा असल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे