साखरवाडी(गणेश पवार)
खामगाव ता फलटण येथील स्वयंभू दत्त मंदिराचे मठाधिपती उमेशानंद सरस्वती यांना
बृहन महाराष्ट्र ज्योतिष आयोजित 94 व्या ज्योतिष प्रसार दिंडी व 18 व्या विभागीय ज्योतिष संमेलना मध्ये
वराह मिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्बल “ज्योतिर्विद्या वाचस्पती” हि डॉक्टरेट पदवी व सुवर्ण पदक वराह मिहीर ज्योतिष मुक्त विद्यापीठ याचे कुलगुरू मा.आनंदकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते बहाल करण्यात आले दिनांक २२व २३ एप्रिल रोजी बारामती डेंगळे गार्डन याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार जकातकार, मालती शर्मा , विजयकुमार डेंगळे , सूरजशेठ सातव मा नगरसेवक बारामती व महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक उपस्तिथ होते.
उमेश महाराज हे खामगाव चे रहिवाशी असून स्वयंभू दत्त मंदिर व श्री क्षेत्र जोगमठ येथे ते मठाधीपती आहे काही दिवसा पूर्वी त्यांनी जुनगढ गिरणार गुजरात येथे जुना आखाडा मध्ये सामील होऊन महंत् झाले आहेत त्या नंतर त्यांचे नाव उमेशानंद सरस्वती असे ठेवण्यात आले आहे