साखरवाडी गणेश पवार
साखरवाडी तालुका फलटण येथे एकाला चाकू व कुकरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून पाच जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित सुरेश हरक्या भोसले, बहिऱ्या जिंदा भोसले, शहा जिंदा भोसले, वरडोळ्या सुरेश भोसले, शेख सुरेश भोसले अशी संशयितांची नावे असून फिर्याद अवकाश जीवराम शिंदे वय 55 यांनी दिली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि 21 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जाऊन संशयित वरडोळ्या सुरेश भोसले व सुरेश हरक्या भोसले यांनी चाकूने व कुकरीने वार करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार हंगे करीत आहेत